जावा
जावा : इंडोनेशियातील सर्वांत महत्त्वाचे बेट. क्षेत्रफळ १,३४,७०३ चौ. किमी.; लोकसंख्या ७,६१,०३,००० (१९७१). ह्या बेटाच्या मध्यभागी एक पूर्वपश्चिम डोंगरांची रांग पसरलेली असून त्यात कित्येक ज्वालामुखीही आहेत. त्यांपैकी समेरू सर्वांत उंच ३,६७६ मी. आहे. पूर्वेकडील राऊंग ३,३२२ मी. उंच आहे.